भारतीय जनता पार्टी ही वॉशिंग मशीन असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं
- या वेळेस त्या वॉशिंग मशीन मध्ये काळेकुट्ट व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनाही पांढरे शुभ्र करण्याचं हे भाजप असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं
- जर प्रवास बघितला तर छगन भुजबळ, अजित पवार एवढेच नव्हे तर एकापेक्षा एक हे भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या लोकांना पक्षात प्रवेश दिला आहे आणि आज सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमातून पक्षप्रवेश म्हणजे आता या वॉशिंग मशीनने शिखर गाठलेला आहे
- सलीम कुत्ताशी असणारे त्यांचे संबंध हे भारतीय जनता पार्टीच सांगत होती आणि आता त्यांनीच त्यांना आपल्या पक्षात घेतले आहे
- बावनकुळे आणि बडगुजर यांची विशेष मैत्री निर्माण झाली आहे
- तेच विरोध करत होते आणि त्यांनीच स्वागत केले आहे
- बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा हा दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे
- जर बडगुजर भाजपमध्ये गेले नसते तर ते तडीपार झाले असते. त्यामुळे तडीपारीची कारवाई रोखण्यासाठी त्यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे
0 Comments