Ticker

6/recent/ticker-posts

अखेर नऊ वर्षांनी मिळाले श्रीरामपूर परिषदेला समिती सभापती

गेल्या २०१६ नंतर श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये विशेष  समिती झालेली नव्हती त्यामुळे नगरपरिषद कामकाजामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या   नंतर २०२१ प्रशासक काळात चार वर्ष प्रशासकाचा काळ असल्यामुळे नगरपरिषद मध्ये  प्रशासक राज होते परंतु या वर्षी पालिकेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाने यांनी मोठा विजय प्राप्त केल्यामुळे मिळवलेल्या यशामुळे नगरपरिषद मध्ये आज नगरसेवकांची सभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये  सर्व समिती सभापती निवड करण्यात आली यामध्ये पाणीपुरवठा समिती सभापतीपदी योगेश जाधव, बांधकाम समिती सभापती पदी रईस शेख ,आरोग्य समिती सभापती पदी दीपक वमने, शिक्षण समिती सभापतीपदी राजेंद्र पवार ,महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मंजुश्री मुरकुटे उपसभापतीपदी नागेश्वरी एडके आदींची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी  लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा ससाणे ,आमदार हेमंत ओगले ,उपनगराध्यक्ष कांचनताई सानप ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर आदी महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते गेल्या नऊ वर्षापासून रखडलेल्या विशेष समिती सभापतीमुळे शहराच्या दैनंदिन कामकाजात नागरिकांना मदत होणार आहे

Post a Comment

0 Comments