Ticker

6/recent/ticker-posts

राहुरी फॅक्टरीतील येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही आयोजित

 राहुरी फॅक्टरीतील येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही आयोजित गणेशोत्सवाची आज अनंत चतुदर्शीनिमित्ताने महाआरतीने सांगता झाली. गणेशोत्सव निमित्ताने साई आदर्श परिवारातील महिला भगिनींसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.





आज सकाळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व साई आदर्श पतसंस्था चेअरमन संगीता कपाळे यांच्या हस्ते महाआरती पार पडली.


 यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णूपंत गीते,  शांती चौक मित्र मंडळ अध्यक्ष दीपक त्रिभुवन, योगगुरु किशोर थोरात रामेश्वर तोडमल , संदीप गायकवाड , ऋतुराज थोरात आदी उपस्थित होते. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण कविता जेजुरकर यांनी केले.


रांगोळी स्पर्धेतील विजेत्या नूतन तनपुरे, दिव्या हिरे, पूजा निघूते, राणी पवळे, मुक्ता औटी, स्वाती देशमुख, रुपाली गाडेकर आदी महिला कर्मचाऱ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.


यावेळी बोलताना साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे म्हणाले की, साई आदर्श परिवाराच्यावतीने गणेशोत्सवनिमित्ताने पुढील वर्षी सांस्कृतिक महोत्सव राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम, व्याख्यान, विविध स्पर्धा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येईल असे ते म्हणाले. सुत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक सचिन खडके, याकूब शेख यांसह कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments