Ticker

6/recent/ticker-posts

ओला दुष्काळ जाहीर करा आमदार हेमंत ओगले

श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या  प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने तात्काळ ओला  दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार हेमंत  ओगले यांनी केली असून  पावसामुळे सोयाबीन ,कापूस, ऊस ,फळबागा  इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढलेल्या आलेले सोयाबीन अक्षरशा पावसामुळे वाहून गेले तालुक्यातील खैरी निमगाव, गोंडेगाव, माळेवाडी,सरला, ब्राह्मणगाव, चांदेगाव, बेलापूर इत्यादी ठिकाणी आमदार हेमंत ओगले यांनी पाहणी केली असून शहरातील काही भागात पाणी साचले असून त्याची देखील पाहणी करण्यात आली सरकारने तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करून  कुठल्याही प्रकारची आडकाठी न आणता व नियमन बोट न ठेवता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली असून यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर ,माजी सभापती बाबासाहेब दिघे आधी महत्त्वाची पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments