Ticker

6/recent/ticker-posts

एन . एम. एम. एस . स्पर्धा परीक्षेत डावखर कन्या विद्यालयाची उज्वल परंपरा कायम

*एन. एम. एम. एस. स्पर्धा परीक्षेत डावखर कन्या विद्यालयाची* उज्ज्वल यशाची सुवर्णपरंपरा कायम! 

 डावखर कन्या विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची पताका अभिमानाने फडकवली आहे. *राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची समजली जाणारी एन. एम. एम. एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती)* स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यालयातील दोन होतकरू विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 *कु. अंजली सुभाष गायकवाड  कु. दिव्या रवींद्र गायकवाड* या विद्यार्थिनींनी आपल्या बुद्धिमत्ता, चिकाटी, अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर ही यशशिखरे गाठली आहेत. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण विद्यालय परिवारात आनंदाची लहर पसरली असून विद्यालयात गौरवाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे यश म्हणजे त्यांच्या जिद्दीचा, आत्मविश्वासाचा आणि शिस्तबद्ध परिश्रमांचा परिपाक आहे.

या यशामागे संस्थेचे आदरणीय *चेअरमन श्री. संजय फंड साहेब* यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठबळ लाभले आहे. तसेच *संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त श्री. नारायणजी डावखर साहेब, करण दादा ससाणे,सेक्रेटरी महाताजी यादव, विजय शिंदे, भारतीताई कांबळे, अभय शेठ बाफना,  रमण अण्णा मुथा, संजीव आगाशे, कांती शेठ पटेल ,यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन हे विद्यालयाच्या प्रगतीचे भक्कम आधारस्तंभ ठरले आहे. त्यांच्या प्रेरणेनेच विद्यालयाने गुणवत्तेचा ध्यास घेत सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावला आहे.

विद्यालयातील कर्तव्यदक्ष, उपक्रमशील आणि समर्पित शिक्षकवृंदांचे या यशात मोलाचे योगदान आहे. *श्री. तोरणे सर, सौ. देशमुख मॅडम, श्री. जाधव सर, श्री. उंडे सर* यांनी विद्यार्थिनींना अभ्यासाची योग्य दिशा, नियमित सराव, शंका समाधान आणि मानसिक बळ देत त्यांचा आत्मविश्वास दृढ केला. त्यांच्या परिश्रमांमुळेच विद्यार्थिनींनी यशाचे सुवर्णपान आपल्या नावावर कोरले आहे.

तसेच विद्यालयाच्या *मुख्याध्यापिका श्रीमती बोधक मॅडम* यांनी वेळोवेळी विद्यार्थिनींना  मार्गदर्शन केले केले. त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे विद्यालयात शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा अधिक बळकट झाली आहे.

या उल्लेखनीय यशामुळे सर्व  सेवकांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून भविष्यातही विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक उपक्रम आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करण्यासाठी सर्वजण अधिक जोमाने कार्यरत राहतील, असा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

या दैदिप्यमान कामगिरीबद्दल यशस्वी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले .🌸✨

Post a Comment

0 Comments