Ticker

6/recent/ticker-posts

एन.एम. एम .एस . परीक्षेत महाराष्ट्र सेवा मंडळाचा डंका कायम

ज्ञानदीपाच्या तेजाने उजळलेल्या प्रेमजी रतनसी पटेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाच्या आकाशात उत्तुंग भरारी घेत विद्यालयाच्या किर्तीमध्ये सुवर्णअक्षरांनी नवे पर्व लिहिले आहे.
एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्तायादीत विद्यालयाचे तब्बल चार विद्यार्थी 
*साईश पाटील*
*सार्थक दळवी*
*साई चिंतामणी*
*शौर्य चव्हाण*
तेजस्वी तारकांप्रमाणे झळकले, ही संस्था परिवारासाठी अभिमानाची व समाधानाची बाब ठरली आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यालयाचे दूरदर्शी चेअरमन मा. श्री. संजय फंड साहेब, ज्येष्ठ व कल्पक विश्वस्त मा. श्री. नारायणरावजी  डावखरं साहे, करण दादा ससाणे, भारतीताई कांबळे ,अभय शेठ बाफना ,संजीव आगाशे, विजय शिंदे, कांतीलाल शेठ पटेल,ब तसेच सर्व मान्यवर विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे कौतुकपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामागे अष्टपैलू व कर्तृत्ववान शिक्षक मा. श्री. माळी सर, श्री. शेंडगे सर, श्री. आंधळे सर यांचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापक मा. श्री. शेवाळे सर यांचे प्रेरणादायी नेतृत्व हेच खरे यशाचे भक्कम आधारस्तंभ ठरले.
विद्यालयाच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे संपूर्ण विद्यालय परिवारात आनंदाची लहर पसरली असून, भविष्यातही अशाच यशशिखरांकडे वाटचाल करण्याचा दृढ संकल्प अधिक बळकट झाला आहे. 🌟

Post a Comment

0 Comments